Amit Deshmukh : "सरकारी यूनानी मेडिकल कॉलेजची लातुरात लवकरच सुरुवात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच राज्यात खास अल्पसंख्यांक समूहासाठी सरकारी वैद्यकीय रुग्णालय आणि कॉलेज सुरु करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. ते आज लातूर येथे अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. 

लातूर येथे अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी शासकीय वसतीगृहाच्या इमारातीचे लोकार्पण आज करण्यात आले. 100 मुलींच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. "अल्पसंख्यक समाज मागील काही दिवसांत स्वत:ला असुरक्षित समजत आहे. परंतु, राज्य सरकार त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शक्षम आहे, असे आश्वासन यावेळी अमित देशमुख यांनी दिले. 

अमित देशमुख म्हणाले, "अल्पसंख्यांक समाजाने कायम लातूर आणि नांदेच्या नेतृत्वाला साथ दिली आहे.  लवकरच अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी वसतीगृहाची निर्मित करण्यात येणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लातुरात सरकारी यूनानी मेडिकल कॉलेजची सुरुवात करण्यात येणार आहे. आम्ही यावरच थांबलो नसून राज्यस्तरावर खास अल्पसंख्यक समाजासाठी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालये निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबत मंत्रिमंडळात विचार विनिमय होत आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्वाच्या बातम्या

Bharat Bandh 2022 : 28 आणि 29 मार्चला भारत बंद, बँकिंग, वाहतुकीसह विविध सेवांना बसणार फटका!

Imtiyaz Jaleel : मला खासदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा; जलील यांचा गौप्यस्फोट

Nanded : नांदेडमध्ये बर्निंग ट्रकचा भर रस्त्यात थरार,चालकाचा मृत्यू