एक्स्प्लोर

Lumpy Skin Disease: लम्पी रोगाचे संकट: नांदेड जिल्ह्यातील गुरे, म्हशींचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

Lumpy Skin Disease: लम्पी आजाराला अटकाव करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने गुरांचा, म्हशींच्या बाजार भरवण्यास बंदी घातली आहे.

Lumpy Skin Disease:  लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाने लम्पी चर्मरोगावर (Lumpy Skin Disease) नियंत्रण, प्रतिबंध, निर्मुलन करण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन केले आहे. या अनुषंगाने गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची कोणत्याही ठिकाणाहून ने-आण करणे, बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांच्या जत्रा भरविणे, प्रदर्शन भरविणे किंवा प्राण्यांना एकत्र आणून कार्यक्रम करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातले आहेत. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

लम्पी चर्मरोगाबाबत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणापासून इतर कोणत्याही ठिकाणी त्यांना नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, गोवंश प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, म्हशींच्या संपर्कात आलेले कोणत्याही प्रकारचे वैरण, निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य  साहित्य यांच्या वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. त्याशिवाय, प्राण्यांचे शव, कातडी किंवा प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.  

प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जनावरांमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या बाधित झालेलया गुरांना व म्हशींना आणणे अथवा त्यासाठी प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

गुरांचा बाजार बंद

जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लम्पी चर्मरोग असल्याने संशयित असलेल्या किंवा संक्रमित किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी करण्यास आणि कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

मराठवाड्यात लम्पीचा प्रसार 

मराठवाड्यातील (Marathwada) 197 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 78 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. मराठवाड्यात 53 गावांमध्ये हा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले आहे. औरंगाबादमध्ये 33,  जालनामध्ये 7,  बीडमध्ये 26,  परभणीत 20,  लातूरमध्ये सर्वाधिक 102  आणि उस्मानाबाद  9 जनावरे बाधित आहेत. नांदेडमध्ये एकही प्रकरण समोर न आल्याने जिल्ह्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget