Maharashtra Agri Budget 2022 : आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. कारण आज महाविकास आघाडीकडून 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना या अर्थसंकल्पातून विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी 8 मार्च 2021 ला अर्थसंकल्प सादर झाला होता. याबाबत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत नाही असे नवले म्हणाले. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासंदर्भात नेमक्या कोण कोणत्या घोषणा केल्या होत्या. पाहुयात यासंदर्भातील माहिती...

  


मागील वर्षी 8 मार्च 2021 ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील काही घोषणा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. काही योजनांवर पैसे खर्च झाले मात्र, त्याच्यातून काही क्रांतीकारक बदल किंवा शेतकऱ्यांना फार काही काही फायदा झाल्याचे दिसत नाही.


मागील वर्षी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या होत्या?



  • 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकरअयांना शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा

  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत

  • शेतकऱ्यांना कृषीपंप वीज तोडणी देण्याकरताा महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल

  • थकीत विजबिलात शेतकऱ्यांना 3 टक्के सूट, उर्वरीत थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार  411 कोटी रुपये रक्कम माफ

  • शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजीत किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

  • प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका स्थापन करणार

  • राज्यातल 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार

  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींन गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींग करता अनुदान


याबाबत एबीपी माझा डिजिटलने, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मागील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत केली होती. मात्र, त्याचे काही दृश्य स्वरुपात परिणाम दिसून आले नाहीत. पैसे खर्च झाले असतील पण, पायाभूत सुविधा वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना जाणवतील असे बदल यामध्ये झले नसल्याचे अजित नवले म्हणाले. शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा केली होती. त्यामध्ये देखील काही ठोस निर्णय झाले नाही. घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत असल्याचे नवले म्हणाले. या योजनांच्या माध्यमातून काही गुणात्क बदल झाल्याचे दिसत नसल्याचे नवले म्हणाले.


दरम्यान, थकीत वीज बिलाच्या बाबतीत देखील अनेक समस्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्य सव्वा बिले आली आहेत. त्या बिलांच्या दुरुस्ती देखील अद्याप झाली नाही. वीजतोडणीच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 


महत्त्वाच्या बातम्या: