Valimai Box Office Collection : थाला अजितच्या ‘वालीमाई’ने (Valimai) एकट्या तामिळनाडूमध्ये 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती बनला आहे. तामिळनाडूमध्ये अजित हा एक सुपरस्टार आहे. या चित्रपटाने सलग दोन आठवड्यांत हा विक्रम केला असून, अजित स्टारर हा चित्रपट कमी वेळात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजितच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडली आहे.


'वालीमाई' चित्रपटात अजित कुमार (Ajith Kumar) मुख्य भूमिकेत आहेत. ‘वालीमाई’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर 218.04 कोटी कमावले आहेत, ज्यांनी ‘भीमला नायक’ला देखील मागे टाकले आहे. अजित स्टारर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात केवळ तामिळनाडूच्या बॉक्स ऑफिसवर 133.47 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


दुसऱ्या आठवड्यात वालीमाईचे तामिळनाडूमधील कलेक्शन


शुक्रवार: 3.42 कोटी


शनिवार: 3.60 कोटी


रविवार: 4.15 कोटी


सोमवार: 5.03 कोटी


मंगळवार: 0.81 कोटी


बुधवार: 0.65 कोटी


गुरुवार: 0.56 कोटी


दुसरा आठवडा एकूण: 18.22 कोटी


पहिला आठवडा एकूण: 133.47 कोटी


दोन आठवड्यांनंतर एकूण: 151.69 कोटी



दुसऱ्या आठवड्यात वालीमाईचे वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन 


शुक्रवार: रु. 4.50 कोटी


शनिवार: 4.73 कोटी


रविवार: 5.40 कोटी


सोमवारः 6.12 कोटी


मंगळवार: 1.47 कोटी


बुधवार: 1.31 कोटी


एकूण: 23.53 कोटी


पहिला आठवडा एकूण: 193.41 कोटी


2 आठवड्यांनंतर एकूण: 216.94 कोटी


या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळतो आहे. विकेण्डला या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'वालीमाई' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने ‘पुष्पा’, ‘भीमला नायक’ या चित्रपटांना तगडी स्पर्धा दिली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha