ICRA Alert on Aluminum Rate : जागतिक स्तरावर अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. रेटिंग एजन्सी इक्राने म्हटले आहे की, मागणी आणि पुरवठा संकटाच्या भीतीने जागतिक साठ्यात घट झाल्यामुळे अ‍ॅल्युमिनियमच्या किमती वाढतच राहतील. जागतिक अ‍ॅल्युमिनियम व्यापारात रशियाचा वाटा 12 टक्के आहे. रशियाच्या अ‍ॅल्युमिनियमच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यास पुरवठा संकट आणखी गडद होईल. इक्राने सांगितले की, पुरवठ्याच्या कमतरतेमुळे जगभरातील त्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल आणि जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत किमती वाढतच राहतील.


अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीने गाठला सर्वोच्च उच्चांक


इक्राने सांगितले की, मार्चच्या पहिल्या आठवड्यात अ‍ॅल्युमिनियमच्या किमती 3,875 डॉलर प्रति टन या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्या आणि सध्या त्याची किंमत 3,320 डॉलर प्रति टन आहे. अ‍ॅल्युमिनियमच्या किमती जागतिक पुरवठ्यातील तुटवड्याचा पुरावा आहेत. याशिवाय, युरोपीय देशांमध्ये अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीत झालेली वाढ हे देखील जागतिक बाजारपेठेत वाढ होण्याचे कारण आहे. सप्टेंबर 2021 पासून युरोपियन बाजारात अ‍ॅल्युमिनियमची किंमत तीन पट वाढली आहे.


अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीमुळे देशांतर्गत उत्पादकांना नफा


ICRA ही स्वतंत्र, व्यावसायिक गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. ICRAचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समूह प्रमुख जयंता रॉय यांनी सांगितले की, देशांतर्गत अ‍ॅल्युमिनियम उत्पादकांच्या गरजा कोळसा-आधारित कॅप्टिव्ह पॉवर प्लांटमधून पूर्ण केल्या जातात आणि त्यांच्या दोन तृतीयांश कोळशाच्या गरजा कोल इंडियाच्या कॅप्टिव्ह खाणींमधून पूर्ण केल्या जातात. याशिवाय 2023 आर्थिक वर्षात अनुकूल अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीमुळे देशांतर्गत उत्पादकांना नफा होईल. अनुकूल देशांतर्गत मागणी व्यतिरिक्त, निर्यातीचा पर्यायही खुला आहे, ज्यामुळे देशांतर्गत उत्पादकांना फायदा होईल.


स्टीलच्या दरातही वाढ


स्टीलच्या किमतीतही जोरदार वाढ झाली आहे आणि जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे स्टीलच्या किमतीही वाढू शकतात. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या रशियावर आर्थिक निर्बंधांमुळे अनेक वस्तूंच्या आयातीवरही परिणाम झाला आहे आणि त्याच्या परिणामामुळे किमती वाढत आहेत. गहू, पोलाद, अ‍ॅल्युमिनियम, खाद्यतेलाच्या वाढत्या किमती याचा पुरावा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha