एक्स्प्लोर

हिंगोलीत हळदीचा भाव पडला फिका! सोयाबीनलाही मिळेना भाव, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Turmeric Market: यंदा हळदीची विक्रमी विक्री झाली. मात्र, १७ ते १८ हजारांवरुन घसरुन खाली आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Hingoli News: राज्याच्या बाजारात हिंगोलीच्या हळदीचा भाव (Turmeric Market)  फिका पडला असून सोयाबीन पाठोपाठ आता हळदीची क्विंटल मागे दरघसरण सुरूच आहे. एप्रिल व मे महिन्यात 16 ते 17 हजार रुपयांवर गेलेला हळदीचा भाव उतरला असून तो 13000 रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

राज्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक हळदीची आवक व विक्री झाली. सांगली, हिंगोली, वसमत येथे बाजार समितीच्या बाहेर लांबच लांब वाहनांची रांग लागल्याचे दिसले. मात्र खरीप हंगामाच्या सुरुवातीला हळदीची आवक मंदावली असून लोकलसह राजापुरी हळद केवळ 13 हजारांवर विकली जात आहे. 18 ते 19 हजार रुपयांवर असणाऱ्या हळदीची वेगाने घसरण सुरू झाली असून आवकही मंदावल्याचे चित्र आहे.

हळदीची आवक मंदावली

मागील दोन दिवसात राज्यात एकूण 4700 क्विंटल हळदीची आवक झाली. यावेळी मिळणाऱ्या सर्वसाधारण भाव हा 12 ते 14 हजारांवर असून हिंगोलीत लोकल हळदीला अवघे 12500 प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे दिसून आले.

गेल्या चार दिवसात हळदीची आवक कशी होती?

मागील चार दिवसात हिंगोलीत हळदीची आवक मंदावली असून किमतीत चढउतार दिसून आला. बुधवारी लोकल हळदीची आवक  १४५० क्विंटल होती. यावेळी सर्वसाधारण १२५०० ते १३००० रुपयांचा भाव हळदीला मिळाला.  त्याआधीदेखील हळदीची आवक साधारणपणे ५१५ क्विंटल ते ८०० क्विंटलच्या मध्ये होती. तर मिळणार दर सर्वसाधारण १२ ते १४ हजारांपर्यंतच असल्याचे पणन विभागाने सांगितले.

सोयाबीनचा भाव वाढणार कधी?

जिल्ह्यात सोयाबीनदराची ही कोंडी कायम असल्याचे दिसून येत असून सोयाबीन ने अजून 5000 चा पल्लाही गाठलेला नाही. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने तसेच पिवळा मोझॅक प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील सोयाबीन पिवळे पडले. काही दिवसात भाव वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीला पसंती दिली. मात्र सहा सात महिन्यांनंतरही सोयाबीन दर कोंडी कायम असल्याचे दिसून येत आहे.

हळदीची विक्रमी आवक

यंदा हळदीची विक्रमी आवक झाल्याचे चित्र होते. हिंगोलीसह सांगली, वसमत, तसेच विदर्भातील वाशिम, यवतमाळ , वर्धा जिल्ह्यातूनही हळदीची आवक झाली होती. परंतू जुन महिन्याच्या सुरुवातीपासून हळदीच्या भावात घसरण सुरु झाली असून १६ ते १७ हजार रुपयांवर असणारे भाव आता १२ ते १३ हजारांवर आले आहेत.

हेही वाचा:

मिश्र शेतीचा चमत्कार! वर्षाला शेतकरी कमवतोय 15 लाख रुपये, नेमकं कसं केलं नियोजन? 

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget