First Donkey Farm In Karnataka : दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील एका गावात एका 42 वर्षीय व्यक्तीने गाढव फार्म सुरू करून इतिहास रचला आहे. ८ जून रोजी सुरू केलेले हे फार्म कर्नाटकातील पहिले आणि केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यानंतर देशातील दुसरे आहे. शेतमालक श्रीनिवास गौडा म्हणतात की गाढवांचे फार्म सुरू करताना अनेकदा नकार आला, तसेच त्यांना कमी लेखले गेले.
सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली
बीए पदवीधर असलेल्या गौडा यांनी सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर 2020 मध्ये इरा गावात 2.3 एकर जागेवर प्रथम एकात्मिक कृषी आणि पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकास केंद्र सुरू केले. शेळीपालनापासून सुरुवात केलेल्या या फार्ममध्ये आधीच ससे आणि कडकनाथ कोंबड्या आहेत. गौडा म्हणाले की, गाढवाच्या फार्ममध्ये 20 गाढवे असतील.
लोकांना पॅकेटमध्ये गाढवाचे दूध देण्याचा विचार
वॉशिंग मशिन, तसेच कपडे धुण्यासाठी वापरात आलेले इतर तंत्रज्ञान यामुळे गाढवांचा वापर कमी होत गेला. यामुळे गाढवांच्या प्रजातींची संख्या कमी होत असल्याचे कारण त्यांनी सांगितले, गौडा म्हणाले की, जेव्हा गाढवाच्या फार्मची कल्पना त्यांच्याशी शेअर केली गेली, तेव्हा अनेक लोक घाबरले आणि त्यांची खिल्ली उडवली. गाढवाचे दूध चवदार, खूप महाग आणि औषधी मूल्य आहे. गौडा लोकांना पॅकेटमध्ये गाढवाचे दूध देण्याचा विचार करत आहेत.
मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमधून करणार पुरवठा
ते म्हणाले की 30 मिली दुधाच्या पॅकेटची किंमत 150 रुपये आहे. मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमधून पुरवठा केला जाईल. सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे गाढवाचे दूध विकण्याचीही योजना आहे. ते म्हणतात की 17 लाख रुपयांच्या ऑर्डर आधीच मिळाल्या आहेत.
गाढविणीच्या दुधापासून साबण बनवण्याचा प्रयोग यशस्वी
आपल्याला गाय , म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे . गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि उमरगा शहरात सध्या दहा व्यवसायिक गाढविणीच्या दुधाची घरोघरी जावून विक्री करत आहेत. टाटा सामाजिक संस्थेच्या विद्यापीठात गाढविणीच्या दुधाचे साबण बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग आणि उमरगा परिसरात गाढविणीचे दुध शंभर रुपयाला 10 मिली या दराने विकले जाते आहे. या दराने गाढवाच्या दुधाचा दर एक लिटरमागे दहा हजार रुपये होतो. हे लोक गाढविणीला सोबत घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत.
आरोग्यासाठी उत्तम
एक गाढविण दररोज पाव लिटर दुध देते. शहरात फिरल्यानंतर कधी एका व्यावसायिकांचे 300 रुपयांचे तर कधी 400 रुपयांचे दूध विकले जात आहे. नळदुर्ग शहरात दररोज 15 गाढविणीचे 4500 रुपये ते 5 हजार रुपयांचे दूध विकले जाते. गाढविणीच्या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ, न्यूमोनिया असे आजार होत नाहीत असा समज आहे. लहान मुलांना सर्दी, पडले असे आजार होऊ नयेत म्हणून या दुधाचा वापर केला जायचा.नांदेड जिल्ह्यातील अशा प्रकारचा व्यवसाय करणारे व्यावसायिक सध्या 15 गाढविणींसह नळदुर्ग, उमरगा शहरात दाखल झाले आहेत.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये ही उपचार पद्धती रूढ आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी आहे. या दोन्ही राज्यात गाढविणीचे दूध ८ हजार रुपये लिटर या भावाने विकले जाते असा दावा केला जातोय.
इतर बातम्या
- Viral Video : चक्क गोरिला चालवतोय सायकल... तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
- Viral Video : बाईकवर बसण्यासाठी दोन कुत्र्यांमध्ये जुंपली, मालकानं शोधली 'ही' युक्ती
- Trending Video : झक्कास आयडिया! चक्क ड्रोननं तोडले आंबे, व्हिडीओ होतोय व्हायरल