Dogs Riding Bike : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. असे प्राण्यांचे मनोरंजक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. मग ते अगदी भांडणाचे असो शिकारीचे असो वा गोंडस व्हिडीओ. या व्हिडीओंमुळे युजर्सचं चांगलच मनोरंजन होतं. प्राण्यांमध्ये कुत्र्यांचे (Dogs) व्हिडीओ नेटकऱ्यांच्या अधिक पसंतीस उतरतात.


सोशल मीडियाच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन कुत्रे दिसत आहेत. माणसांप्रमाणेच या कुत्र्यांनाही बाईक राईड करायला आवडतं असं दिसून येत आहे. या कुत्र्यांनाही माणसांप्रमाणेच बाईकवर फिरायला आवडतं. यावरून चक्क या दोन कुत्र्यांमध्ये भांडण सुरु होतं.






 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन कुत्रे दिसत आहेत. दोन्ही कुत्रे त्यांच्या मालकाच्या बाईकच्या दोन्ही बाजूला उभे राहून दुचाकीवर बसण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही कुत्र्यांना बाईकवर बसायचं आहे. 


कुत्र्यांसाठी मालकानं शोधली युक्ती
कुत्र्यांचे बाईकप्रती असलेले प्रेम पाहून मालकानही दोघांना बाईकवर बसवण्याचं ठरवलं. मालकानं युक्ती सुचवून दोन्ही कुत्र्यांना बाईकवर बसवलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा बाईकच्या समोरच्या टाकीवर बसला आहे, तर दुसरा कुत्रा मागच्या सीटवर बसला आहे. अशा प्रकारे आता दोन्ही कुत्रे त्यांच्या मालकासह बाईकवर फिरायला जाऊ शकतात.


व्हिडीओ झाला व्हायरल 
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर oscarnkarma नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओवर नेटकरीही कमेंट करत आहेत.