Viral Video : सध्याच्या आधुनिक युगात ड्रोनबाबत सर्वांनाच माहिती आहे. ड्रोन हा ड्रोन म्हणजे आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार आहे. ड्रोन कोणत्याही व्यक्तीला सहज नियंत्रित करता येतो आणि रोजच्या कामातही वापरता येतो. ड्रोन संबंधित वेगवेगळे व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल होत असतात. ड्रोनचा वापर विशेषतः व्हिडीओग्राफीमध्ये केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानासह लोकही आधुनिक होत आहेत. ड्रोनच्या सहाय्याने नवनवीन गोष्टी करत आहेत. आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हांला व्हिडीओ पाहिल्यावरचं कळेल. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.


चक्क ड्रोननं तोडले  आंबे
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ड्रोन दिसत आहे. हे ड्रोन झाडावरील आंबे तोडताना दिसत आहे. ड्रोनच्या पंख्याचा वापर करुन या पठ्ठ्याने चक्क झाडावरील आंबे तोडले आहेत. ड्रोनच्या साहाय्याने आंबे तोडणे योग्य आहे की अयोग्य याबाबत काही सांगता येत नाही. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील या पठ्ठ्याचा जुगाड नक्कीच आश्चर्यचकित करणारा आहे.






 


ड्रोनद्वारे आंबे तोडण्याच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफीसाठी ड्रोनचा वापर आजवर लोकांनी पाहिला होता, पण या व्यक्तीने ड्रोनचा वापर चक्क आंबे तोडण्यासाठी केला आहे.


व्हिडीओ व्हायरल 


'ओंकार सिंहशिखावत' नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत चार लाख 24 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओवर कमेंट्सचाही पाऊस पडत आहे.