एक्स्प्लोर

Farmers Death : शेतीकाम करताना बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा मृत्यू 

बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Farmers Death : बीड जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. केज, गेवराई आणि आष्टी तालुक्यात या घटना घडल्या आहे. शेताकऱ्यांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळं  शेतीमधील मशागतीच्या कामाला वेग आला आहे. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करत आहेत. अशातच शेतीची कामं करताना दुर्दैवी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

केज तालुक्यात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथील बाबूराव गणपतराव चंदनशिवे (वय,55) या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाबुराव चंदनशिवे हे सायंकाळच्या वेळी आपल्या शेतामध्ये विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा स्पर्श एका लोखंडी विद्युत पोलला झाला.त्यावेळी विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बाबुराव चंदनशिवे यांच्या भावाच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेवराई तालुक्यात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू 

गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरी येथे संजय बरगे हे शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाल्यानं विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. संजय बर्गे यांची एक व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी म्हणून गेवराई शहरात ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा त्यांचा परिवार आहे.

आष्टी तालुक्यात तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यातल्या शिरपूर येथे देखील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शिरपूर येथील श्रीकृष्ण जगताप हे आपल्या शेतात असलेली विदूत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटरीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यानंर ते शेततळ्यात उतरले. एका दोरखंडाला पकडून शेततळ्याच्या वर येत असताना अचानक दोरखंड तुटून ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्यानं पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget