एक्स्प्लोर

बारामती तालुक्याला गारपीटीचा तडाखा, फळबागांचं मोठं नुकसान, बांधावर जात युगेंद्र पवारांचा सरकारला इशारा

बारामती तालुक्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Baramati Unseasonal Rain : सध्या राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही भागात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, बारामती तालुक्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी  शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली. सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळं लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितलं.

भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या

बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे. होळ, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या झाल्यात. यानंतर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाचीवाडी, वडगाव बुद्रुक यासह इतर परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत युगेंद्र पवार यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला. सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही म्हणून लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे देखील युगेंद्र पवारांनी सांगितलं.

परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांत गारपीटही झाली आहे.अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीची चिंता व्यक्त होत आहे.गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी गावात गारपीठ ही झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

 
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने जोर धरल्याने रस्त्यांवर पाणी साचले तर वाहनचालक आणि नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, भडगाव तालुक्यातील गुढे, आडळसे व जुवार्डी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे ग्रामीण भागातही मोठा परिणाम दिसून आला असून गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज झालेल्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या उकाड्यात काही प्रमाणात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget