एक्स्प्लोर

Cotton News : चालू हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ, नव्या कापसाला मिळाला 'एवढा दर'

यावर्षीच्या हंगामातील कापूस (Cotton) खरेदीला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ही कापसाची खरेदी सुरु करण्यात आली आहे.

Cotton News : यावर्षीच्या हंगामातील कापूस (Cotton) खरेदीला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील कापसाला 7 हजार 53 रुपयांचा दर मिळाला आहे. तर जुन्या कापसाला 7 हजार 600 रुपयांचा दर मिळाला आहे. मात्र, कापसाचा उत्पादन खर्च पाहता हा दर 10 हजार रुपयांचा मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ

यंदा कापसाच्या शुभारंभ प्रसंगी नव्या कापसाला 7 हजार 53 रुपयांच्या भाव मिळाला आहे. तर जुन्या कापसाला 7 हजार 600 रुपयांचा दर मिळाला आहे. मात्र, कापसाचा उत्पादन खर्च पाहता हा दर 10 हजार रुपये मिळायला हवा होता अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथील श्री जी कापूस जिनिंग येथे दरवर्षी कापूस खरेदीचा मुहूर्त असतो. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुहूर्ताच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरवर्षी शुभारंभ प्रसंगी नेहमीच चढ्या दरानं कापूस खरेदी केली जात असते. मात्र यंदा कापसाला कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

कापूस उत्पादनाचा खर्च पाहता सध्या कापसाला कमी दर

मागील वर्षीचा कापूस अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे. नवीन कापसाबाबत अद्यापही देशांतर्गत आणि विदेशातील बाजारपेठेचे चित्र स्पष्ट झाले नाही. कापूस खरेदीदारांनी अतिशय सावध पवित्रा घेत नव्या कापसाला शुभ मुहूर्तावर 7 हजार 53  इतका दर दिला आहे. तर जुन्या कापसाला 7 हजार 600 रुपयांचा दर दिला आहे.  नव्या कापसामध्ये आद्रता जास्त असल्यानं हे दर कमी असल्याचं खरेदीदार सांगत आहेत. मात्र कापूस उत्पादन खर्च पाहता किमान दहा हजार रुपयांच्यावर हे दर असायला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज जरी कापसाचे दर सात हजार रुपयांच्या आसपास असले तरी आगामी काळात देशात आणि विदेशात झालेलं उत्पादन याचा विचार करता कापूस दरात चढ उतार होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मागील वर्षी कापसाला 15 हजार रुपयांचा दर 

मागील वर्षी कापसाला 15 हजार रुपयापर्यंतचा भाव मिळाला होता. त्यामुळं यंदाही कापसाला तितकाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. भावातील चढउतारामुळं शेतकरी कापसाचे भाव वाढेल या अपेक्षेत होते. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला देखील सामोरं जाव लागत आहे. तर दुसरीकडं यंदा राज्यातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. काही ठिकाणी खरीपाची पिकं वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. कमी पावसाचा यंदा कापूस पिकाला देखील चांगलाच फटरा बसला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Cotton Price : अखेर शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव मिळालेच नाही, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त

Embed widget