एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी मुदतवाढ, कुठे कराल अर्ज?

१०० टक्के अनुदानावर मिळतो बॅटरीवर चालणारा फवारणी पंप सरकारकडून देण्यात येत असून यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे..

Battery Operated Spary: राज्यात सध्या चांगला पाऊस होत असल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकून घेतल्या आहेत. कापूस, सोयाबीन क्षेत्रांवर पेरण्या झाल्या असून पिके बहरात आहेत. पिकांवर फवारण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना आता 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. 

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबीयाआधारित पिकांना चालना देण्यसाठी राज्यसरकार कडून एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजना सुरु आहे. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना चालु वर्षासाठी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्जमुदत वाढवली आहे.

कुठे व कसा कराल अर्ज?

शेतकऱ्यांनी  https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

१०० टक्के अनुदानावर मिळतो बॅटरीवर चालणारा फवारणी पंप

 शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती नॅनो युरिया, डीएपी, बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू होते. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही 30 जून पर्यंत होती. त्यानंतर दिनांक 24 जुलै रोजी  नॅनो युरिया, डीएपी, घटकाची सोडत यादी काढण्यात आली होती. 

परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप साठी अद्याप सोडत यादी काढण्यात आली नाही. तर, फक्त बॅटरी संचलित फवारणी पंप साठी आता कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.

अर्जांची संख्या कमी असल्याने देण्यात आली मुदतवाढ

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा १०० % अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील १० दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत अर्जांची संख्या खूप कमी प्रमाणात असल्यामुळे दि. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदत देण्यात येत आहे. 

कसा कराल अर्ज?

1. भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकणे  आणि लॉगिन करणे 
2. अर्ज करा बाबीवर क्लिक करणे 
3. कृषि यांत्रिकीकरण -> बाबी निवडा यावर क्लिक करणे 
4. मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे –» कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
5. तपशिल बाबीवर क्लिक करून – मनुष्यचलीत औजारे घटक निवडणे 
6. यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून – पिक संरक्षण औजारे निवडणे 
7. मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून  बॅटरी संचलीत फवारणी  पंप ( गळीतधान्य)/कापूस निवडणे 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget