एक्स्प्लोर

Abdul sattar : गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदत मागू - अब्दुल सत्तार

Abdul sattar : परतीच्या पावसाने राज्याला झोडपलं होतं. यापावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Abdul sattar : परतीच्या पावसाने राज्याला झोडपलं होतं. यापावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या पिकामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान पाहाता विरोधकांनी राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करा, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे. शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल असे सांगितलं जातं. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार नुकासनग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी परभणी दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल. एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही, असे अश्वासन दिलं. त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागू, असेही सांगितलं.  

परभणीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी दौरा केला. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. मी स्वतः आणि माझे अधिकारी बांधावर जाऊन किती नुकसान झाले, याची माहिती गोळा करत आहोत. साधारणतः सात आठ दिवसांमध्ये ही माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून कॅबिनेटमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा जो काही निर्णय आहे तो घेतील. त्याचप्रमाणे केंद्राकडेही आम्ही मदतीसाठी जाणार आहोत. त्यांचेही पथक राज्यात पाहणीसाठी येईल, त्यानंतर केंद्र सरकार, राज्य आणि पीक विमा अशी तीन प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल. एकही शेतकरी पिक विमा पासून किंवा मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच राज्यात ओला दुष्काळात संदर्भात परिस्थिती नाहीये, मी हे 4 वेळेला बोललो आहे. जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही पाहून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज परभणी दौऱ्यावर होते. त्यांनी जिंतूर आणि असोला या ठिकाणी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मालेगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी तूर कापूस आदी पिकांची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवादही साधला तर लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असेही सांगितलं.  शिवाय शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा :

अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त वक्तव्य, जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं दारु पिता का?

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget