Adani: अदानींपासून प्रेरणा घेत एका कर्मचाऱ्याकडून गरजू शेतकऱ्यांना 50 किलो बियाणांचे वाटप
Gautam Adani: गौतम अदानी यांच्या वाढदिवसानिमित्ताने 60 हजार कोटी रुपयाचे दान अदानी समूहाच्यावतीने करण्यात आले होते. त्यातून प्रेरणा घेत एका कर्मचाऱ्याकडून गरजू शेतकऱ्यांना 50 किलो बियाणांचे वाटप करण्यात आले.
Gautam Adani: प्रख्यात भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त 60 हजार कोटींची देणगी, मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यांची ही घोषणा त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील प्रेरणादायी ठरू लागली आहे. डहाणू येथील अदानी समूहाच्या अदानी थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचारी जिग्नेश बारी यांनी गरजू शेतकरी कुटुंबांना 50 किलो बियाणांचे वाटप केले. त्यांनी केलेल्या या मदतीमुळे त्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आर्थिक फायदाही झाला आहे.
डहाणू येथील अदानी थर्मल पॉवर स्टेशनमधील (Adani Thermal Power Station) कर्मचारी जिग्नेश हे आदिवासी बहुल भागातून येतात. कौटुंबिक पार्श्वभूमी आदिवासी असल्याने त्यांना आदिवासींच्या अडचणींबाबत जाण आहे. त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी स्थानिकांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगारांच्या संधी मिळाव्यात यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू असतात.
जिग्नेश बारी यांनी म्हटले की, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने 60 हजार कोटींचे दान करण्याबाबतची घोषणा केली होती. या घोषणेमुळे मलादेखील प्रेरणा मिळाली. गौतम अदानी यांच्याकडून आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात मोठी मदत मिळत आहे. त्यातून नवीन भारत उभा राहत असल्याचे त्यांनी म्हटले. गौतम अदानी यांच्याकडून प्रेरणा घेत मी स्थानिक आदिवासी कुटुंबाना 50 किलो बियाणांची मदत करण्याचा निर्णय घेतला. अधिक पिक घेण्यासाठी त्यांना मदत होईल, यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
जिग्नेश भाई यांनी म्हटले की, 10 आदिवासी कुटुंबाना 50 किलो बियाणे देण्यात आले होते. त्यातून त्यांनी 4000 किलो धान्याचे उत्पादन घेतले. धान्याचे उत्पादन वाढल्याने त्यांचे उत्पन्नदेखील वाढले. वाढलेल्या उत्पन्नांमुळे आदिवासी कुटुंब आनंदी दिसत होते. या कुटुंबांतील लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद माझ्यासाठी संसस्मरणीय क्षण असल्याचे जिग्नेश बारी यांनी म्हटले.
गौतम अदानी यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अदानी समूहाने 60 हजार कोटींची देणगी, दान करण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय, अदानी समूहाने आयोजित केलेल्या रक्तदान अभियानात कर्मचाऱ्यांनी 14000 युनिट रक्त संकलन केले. देशातील 20 राज्य आणि 115 शहरातील 152 ठिकाणांवर रक्तदान करण्यात आले. त्याशिवाय, गुरांसाठी चारा आणि गरजूंना रेशन किटचे वाटप करण्यात आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: