एक्स्प्लोर

60 हजारात इलेक्ट्रिक स्कूटर्स, झेलियो ईबाईक्सने ग्रेसी सीरीजची स्कूटर्स लॉन्च  

Zelio E Bikes : झेलियो ईबाईक्स (Zelio), एक अग्रगण्य इव्ही टू-व्हीलर स्टार्टअप, त्यांनी कमी-स्पीड इव्ही दुचाकींची श्रेणी- ग्रेसी मालिकेचे अनावरण केले आहे.

Zelio E Bikes : झेलियो ईबाईक्स (Zelio), एक अग्रगण्य इव्ही टू-व्हीलर स्टार्टअप, त्यांनी कमी-स्पीड इव्ही दुचाकींची श्रेणी- ग्रेसी मालिकेचे अनावरण केले आहे. रु. ५९,२७३ ते रु. ८३,०७३ एक्स-शोरूमच्या किंमतींसह, ग्रेसी मालिकेत ग्रेसी आय, ग्रेसी प्रो आणि ग्रेसी प्लस मॉडेल्सचा समावेश आहे. ही घोषणा नूकत्याच लाडवा, हिसार, हरियाणा येथे झेलियो च्या सुरु झालेल्या नवीन उत्पादन युनिटच्या उद्घाटनानंतर करण्यात आली आहे, ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता १,५०,००० वाहने इतकी आहे.

स्त्रिया असो वा पुरूष सर्व शहरी रायडर्ससह, नवशिक्यापासून अनुभवी वाहनचालकांपर्यंत, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी तयार केलेल्या, झेलियो ईबाईक्सच्या नवीनतम बाईक्समध्ये अत्युकृष्ट कामगिरी, शैली, टिकाऊपणा आणि शाश्वतता यांचा समावेश करण्यात आला आहे.

झेलियो ईबाईक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, “आम्ही इव्ही मार्केटमध्ये आमची नवीनतम इ-बाईक सादर करताना अत्यंत आनंदी आहोत, या मार्केटमध्ये व्यावहारिकता, परवडणारी किंमत आणि पर्यावरणीय फायदे यांसह कमी-स्पीडच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स वर्चस्व गाजवतात. शहरी प्रवासी अधिकाधिक किफायतशीर आणि शाश्वत वाहतूक पर्याय शोधत आहेत आणि कमी-स्पीड इव्ही सहज चालना, कमी देखभाल खर्च आणि शून्य उत्सर्जनासह एक आदर्श पर्याय प्रदान करतात.”

“आमची ग्रेसी मालिका प्रचंड संशोधन आणि विकासाची पराकाष्ठा आहे, शहरी रायडर्सच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेली आहे. आम्ही कार्यप्रदर्शन, सुरक्षितता, शाश्वतता आणि शैली यासारखे विविध घटक विचारात घेतले आहेत. आमच्या स्कूटरचे प्रत्येक घटक, डायनॅमिक बीएलडीसी मोटारपासून ते प्रगत ब्रेकिंग सिस्टमपर्यंत, सर्वोच्च गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक निवडले आहेत आणि चाचणी केली गेली. आम्हाला विश्वास आहे की आमचे ग्राहक आमच्या नवीन स्कूटर्सच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि विचारपूर्वक डिझाइनची प्रशंसा करतील.” ते पुढे म्हणाले.

ग्रेसी आय मध्ये ६०/ ७२व्ही मध्ये डायनॅमिक बीएलडीसी मोटार आहे, ज्यामुळे सुरळीत आणि कार्यक्षम राइड सुनिश्चित होते. ६० किलोग्रॅम वजन आणि १५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, बाईकला रस्त्यावर स्थिरता आणि चपळता मिळते. सुधारित सुरक्षिततेसाठी स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि रेयर ड्रम ब्रेक आहेत. या बाईक पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

ग्रेसी प्रो मध्ये ६०/ ७२व्ही ची मजबूत बीएलडीसी मोटार आहे, जी अत्युकृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हता प्रदान करते. एकूण वजन ७० किलोग्रॅम आणि १५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, ही शहरी प्रवाशांसाठी स्थिर आणि आरामदायी राइड प्रदान करते. फ्रंट डिस्क ब्रेक आणि रेयर ड्रम ब्रेकसह सुसज्ज, प्रत्येक प्रवासात सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. या बाईक चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

ग्रेसी प्लस ६०/ ७२व्ही च्या शक्तिशाली बीएलडीसी मोटारसह येते, जी रस्त्यावर उत्कृष्ट प्रवेग आणि कार्यप्रदर्शन देते. ६० किलोग्रॅम वजन आणि १५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, ही शहरी प्रवासासाठी अष्टपैलुत्व आणि चपळता प्रदान करते. फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि रेयर ड्रम ब्रेक्ससह, सुरक्षितता नेहमीच सुनिश्चित केली जाते. या बाईक पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal speech Chakan: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसमोर पहिलं भाषण, भुजबळ भरभरुन बोललेAashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलंChhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Eknath Shinde : मोठी बातमी, गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार,मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार : एकनाथ शिंदे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Embed widget