तेहरान : युक्रेनचं प्रवासी विमात काही दिवसांपूर्वी इराणमधील तेहरान विमानतळाजवळ दुर्घटनाग्रस्त झालं होतं. मात्र हे विमान चुकून पाडल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिली आहे. इराणच्या या चुकीमुळे विमानतील 176 प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. त्यात इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना 8 जानेवारीला समोर आली होती. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणच्या हल्ल्यातच युक्रेनचं विमान कोसळल्याचा दावा अमेरिका आणि कॅनडाने केला होता. आता इराणनेही चूक मान्य करत अनावधानाने युक्रेनचं विमान पाडल्याचं कबूल केलं आहे. या 176 प्रवाशांमध्ये इराणच्या 82, कॅनडाच्या 63, युक्रेनच्या 11 प्रवाशांचा आणि 11 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.
इराणच्या पराराष्ट्र मंत्र्यांकडून माफीनामा
इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जारिफ यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. हा एक दु:खद दिवस आहे. इराणच्या सैन्याच्या प्राथमिक चौकशीत आढळून आलं आले की, एका मानवी चुकीमुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. आम्ही या चुकीबद्दल विमानातील सर्व प्रवाशांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांनी माफी मागतो, असं ट्वीट जावेद जारिफ यांनी केलं आहे.
इराणकडून आधी आरोपांचं खंडन
विमान अपघातानंतर इराणने हल्ल्याच्या दाव्याचं खंडन केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडो यांच्या अनेक देशांना इराणला यासाठी जबाबदार धरलं होतं. इराणने अमेरिकेचं विमान समजून युक्रेनच्या विमानला लक्ष्य केल्याचा आरोपही केला जात आहे.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख जनरल कासिम सुलेमानी मारले गेले होते. सुलेमानी यांच्यासह अनेक सैनिकही मारले गेले होते. सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील तणाव आणखीच वाढला आहे. त्यानंतर इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी हवाईतळांवर हल्ले केले. अमेरिकी सैन्यावर जवळपास डझनहून अधिक मिसाईल यावेळी डागण्यात आले होते. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारुन जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
- इराणचा अमेरिकन लष्करी तळांवर मोठा हल्ला, डझनहून अधिक क्षेपणास्र डागली
- वर्ल्ड वॉर 3 ट्विटरवर ट्रेंड, काय आहे कारण
- अमेरिकेचा पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला, सहा जणांचा मृत्यू
- डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास इराणच्या संस्थेकडून 500 कोटींचे बक्षिस