देशात आणखी एका घातक आजाराचा धोका



देशात आता झिका व्हायरसचा धोका वाढल्याने प्रशासन अलर्टवर आहे.



कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात डासांमध्ये झिका विषाणू आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे.



चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील शिदलघट्टा तालुक्यातील तलकायलाबेट्टा गावातील डासांमध्ये झिका विषाणू आढळून आला.



वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणी अधिक तपासणी आणि चाचण्या करण्यात येत आहेत.



यानंतर, तलकायलबेट्टा गावाच्या पाच किलोमीटरच्या हद्दीत येणारी सर्व गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.



झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे कोणत्याही मनुष्यामध्ये दिसलेली नाहीत.



तालयलाबेट्टा गावाची सुमारे 5 हजार लोकसंख्या राहते. या भागातील गर्भवती महिलांसाठी विशेष इशारा देण्यात आला आहे.



झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.



काही रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.



झिका व्हायरसवर उपाय म्हणजे घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.