गुळामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच तुमची पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते. गुळामध्ये आयर्न, फॉस्फरस यांचे मुबलक प्रमाण असते. तसेच यामधील गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. यामुळे सर्दी खोकला यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. एनीमियाच्या रुग्णांनी दररोज गुळ खाणे अत्यंत फायदेशीर ठरु शकते. रक्त शुद्धीकरणासाठी गुळ खाणं फायदेशीर ठरु शकतं. यामुळे त्वचा देखील उजळण्यास मदत होते. गुळामुळे एनर्जी मिळण्यास मदत होते.