हिवाळ्याच्या दिवसामध्ये सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जास्त प्रमाणात निर्माण होतात. कफ सिरप प्यायल्याने खोकल्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. पण यावर तुम्ही घरीच उपाय करु शकता. यासाठी तुम्ही लवंग घालून चहा पिऊ शकता. यामुळे अनेक फायदे मिळण्यास मदत होऊ शकते. लंवगमधील गुणधर्मामुळे कोरडा खोकला थांबण्यास मदत होऊ शकते. तसेच जर कफ असेल तर लवंग घातलेला चहा पिणं उपयुक्त ठरु शकतं. घसा दुखत असेल तरीही हा चहा फायदेशीर ठरु शकतो. ज्यांना श्वासाचा त्रास असेल त्यांच्यासाठी देखील हा चहा उपयुक्त ठरु शकतो.