इस्लामसाठी तीन वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्री सोडलेली दंगल गर्ल झायरा वसीम हिनेही हिजाबच्या वादात उडी घेतली आहे. झायराने सांगितले की, हिजाब घालणे ही ईश्वराने दिलेली जबाबदारी आहे. धर्म आणि शिक्षणाच्या निवडीमध्ये त्याचा घोळ घालणे योग्य नाही. झायरा वसीमने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, हिजाब ही एक निवड आहे, ही चुकीची माहिती आहे. झायराने स्पष्टपणे सांगितले की हिजाब हा पर्याय नसून इस्लाममध्ये ईश्वराने दिलेली जबाबदारी आहे. मी देखील एक स्त्री आहे आणि मी आदराने हिजाब घालते. माझा या संपूर्ण व्यवस्थेला विरोध आहे, झायरा म्हणाली