आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा पराभव करून इतिहास रचला.



आपल्या पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावलं.



या हंगामात मध्ये कामगिरी करणारा राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं 27 विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकली.



या कामगिरीसह युजवेंद्र चहलनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणार तो पहिला फिरकीपटू ठरलाय.



चहलनं राजस्थान रॉयल्ससाठी 17 सामने खेळला. ज्यात 19.50 च्या सरासरीनं आणि 7.12 च्या इकॉनॉमी रेटनं 27 विकेट्स घेतले.



चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा पहिला फिरकीपटू बनला आहे.



चहल आधी इमरान ताहिरनं 2019 मध्ये चेन्नईकडून खेळताना 26 विकेट्स घेतले होते.



युजवेंद्र चहलनं केवळ सर्वाधिक बळीच मिळवले नाहीत तर त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिकही घेतली.



युजवेंद्र चहल फॉर्म भारतीय संघासाठी चांगला ठरू शकतो. त्यानं भारतीय क्रिकेट संघाच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.