ज्या महिला प्रथमच वट सावित्री व्रत करणार आहेत, त्यांना पूजा मुहूर्त, पूजा पद्धती याविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यंदाची वटपौर्णिमा (Vat Purnima) 14 जून 2022 रोजी आहे, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेची सुरुवात: 13 जून, सोमवार, उत्तर रात्री 09.02 वा ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथी: 14 जून, मंगळवार, संध्याकाळी 05.21 वा. वट पौर्णिमा व्रताचा मुहूर्त : भल्या पहाटेपासूनच प्राप्य व शुभ योग मागणीच्या कामांसाठी चांगले आहेत. प्रथम वडाच्या झाडाला पाणी घालून घायचे. नंतर विड्याचे पान व सुपारी, पैसे घेऊन पूजा करायची आहे. नंतर वडाच्या झाडाला कच्या धाग्याने 5 किंवा 7 फेरे मारावे. कापसाचं वस्त्र झाडाला बांधावे व आरती करावी. मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावावे. वट सावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांना सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते.