आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स पराभव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय.



आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.



आयपीएल 2022 ची ट्रॉफी जिंकून हार्दिक पांड्यानं क्रिडाविश्वावर आपली छाप सोडली.



आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिकला भारताला विश्वचषक जिंकून द्यायचं आहे.



पत्रकार परिषेद बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, त्याला भारताला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे. त्यासाठी काहीही करण्याची हार्दिकची तयारी आहे.



राजस्थान विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्यानं 30 चेंडूत 34 धावा केल्या. तसेच चार षटकात 17 धावा देऊन राजस्थानच्या चार महत्वाच्या फलंदाजाला माघारी धाडलं.



आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्यानं त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला आहे. या हंगामात त्यानं तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी केली आहे.



हार्दिक पांड्यानं या हंगामात 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंड्याचा स्ट्राइक रेट 131.27 होता. तर, सरासरी 44.27 होती.



यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत हार्दिक पांड्या चौथ्या स्थानावर आहे.