अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यानं मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. युवराज सिंह यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फेब्रुवारी 2022 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं जाहीर केलं आहे. 2007 मधील टी-20 आणि 2011 च्या वन-डे विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजनं सिंहाचा वाटा उचलला होता. 2007 मधील टी-20 आणि 2011 च्या वन-डे विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजनं सिंहाचा वाटा उचलला होता. युवराजने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. युवीने 40 कसोटी सामन्यात 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहे. यात तीन शतकं आणि 11 अर्धशतकं करण्याचा पराक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटचा स्पेशालिस्ट समजला जाणारा युवराज भारतीय संघासाठी 58 वेळा मैदानात उतरला आहे. टी-20 मध्ये युवराज सिंहने 1177 धावा बनवल्या आहेत, ज्यात आठ वेळा 50 किंवा यापेक्षा जास्त धावांची खेळी रचली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंह हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. युवराज सिंहने साल 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केवळ 12 चेंडूंमध्ये 50 धावा करण्याचा कारनामा केला होता.