दिवाळी निमित्ताने पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

दिवाळी निमित्त सिहगडावर खास रंगीबेरंगी विद्यूत रोषणाई!

सिंहगडाचा मुख्य दरवाजा, बुरुज आणि सिंहगडावर जाणारी पायी वाट जीथं पोहचते तीथं ही रोषणाई करण्यात आलीय

त्यामुळे सिंहगड झळाळून उठलाय.

फक्त पायथ्यापासुनच नव्हे तर अगदी दुरुनही सिंहगड किल्ला त्यामुळे नजरेत भरतोय.

पुण्यातील गडकिल्ले संवर्धन संस्थेमधे काम करणाऱ्या तरुणांनी स्वखर्चाने ही विद्युत रोषणाई केलीय


यंदा दिवाळीत कठोर निर्बंध नसल्याने देशभरात दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे.

यानिमित्त सिंहगड किल्ल्यालाहीआकर्षक आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्यं...


विद्युत रोषणाईने उजळून निघाला किल्ले सिंहगड!