बॉलिवूडमधील किंग खान अर्थात शाहरूख खानचा आज 56 वा वाढदिवस आहे

शाहरूखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला.

शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले.

तसेच सर्कस या मालिकेमध्य देखील त्याने काम केले. सर्कस आणि फौजी या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

डर, कुछ-कुछ होता है, यस बॉस, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस, DDLJ, मोहब्बतें, बादशाह , देवदास या शाहरूखच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

शाहरूख आणि गौरीची आर्यन, अबराम आणि सुहाना ही मुलं आहेत.

25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले.

शाहरूखची वार्षिक कमाई 38 मिलियन म्हणजेच जवळपास 284 करोड रूपये आहे.

आता लवकरच शाहरूखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बॉलिवूडच्या किंग खानचा आज वाढदिवस!