रसिकाने आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

गोव्याच्या बीचवर त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.

आदित्यने सोशल मीडियावर लग्न सोहळ्याचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, '18 ऑक्टोबर 2021 बीचवर रस्की-आदिचं लग्न '

काही दिवसांपूर्वी रसिकाने आणि आदित्यने प्री- वेडिंग शूटचे फोटो शेअर केले होते.


पण त्या वेळी त्यांनी लग्नाच्या तारखेबद्दल कोणताही खुलासा केला नव्हता.

सोशल मीडियावरील आदित्य आणि रसिकाच्या या फोटोवर कमेंट करून नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये रसिकाच्या शनाया या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

रसिकाने आदित्यसोबतचे काही रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

रसिका सुनीलचा विवाह सोहळा;

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव