जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर तुम्हाला भारताबाहेर प्रवास करणं शक्य होणार नाही. यासाठी तुम्हाला पासपोर्ट नीट सांभाळून ठेवणे आवश्यक असते. एकदा एका ऑस्ट्रेलियाच्या पर्यटकाच्या पासपोर्टवर अश्रूचा थेंब पडल्याने त्याचा पासपोर्ट एक सेंटीमीटर फाटला होता. त्यामुळे त्याला बालीच्या विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला बालीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे चुकनही जर तुमच्या पासपोर्टला घडी पडली आणि त्यामधली माहिती जर पुसली गेली तर तुमचा पासपोर्ट रद्द होऊ शकतो. तसेच जर पासपोर्टची पानं फाटली तरी देखील तुमचा पासपोर्ट रद्द होऊ शकतो. भारत सरकार लवकरच ई-पासपोर्टची सेवा सुरु करण्यात येणार आहे. हा पासपोर्ट अगदी सामान्य पासपोर्टसारखा असेल, फक्त त्यामध्ये एक छोटी इलेक्ट्रॉनिक चिप बसवण्यात येईल. चुकनही पासपोर्टचे पान फाडू नये. त्यापेक्षा जवळच्या पासपोर्ट कार्यालयामध्ये जाऊन नवीन पासपोर्टसाठी अर्ज करा. त्यामुळे पासपोर्ट सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा पासपोर्ट हा ओला झाल्याने खराब होतो.