हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे.



ढगफुटीमुळं भूस्खलन होऊन सर्वत्र मातीचा ढिगारा पसरला आहे.



ढगफुटीमुळं रस्ते बंद झाले आहेत



रस्ते बंद असल्यानं चंबा जिल्ह्यातील अनेक वाहनं अडकली आहेत



मंडीमधील बियास नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय.



भूस्खलन झाल्याने चंदीगड - मनाली राष्ट्रीय महामार्ग काल संध्याकाळपासून बंद आहे



चार मील आणि सात मील परिसरात भूस्खलन झाल्याने अनेक वाहने अडकली आहे.



पराशर मंदिरात दर्शनासाठी गेलेले शंभरहून अधिक विद्यार्थी काल रात्रीपासून रस्ता खचल्याने अडकले आहेत.



रात्री होम स्टेमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.



रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.