पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण झालं. भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. गोवा (मडगाव) -मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्याचे मडगाव रेल्वे स्थानक यांच्या दरम्यान धावेल तसेच गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील पर्यटनाला देखील चालना देईल यापैकी दोन ट्रेन मध्य प्रदेश, एक कर्नाटक, एक बिहार आणि महाराष्ट्रातून धावणार आहेत. बंगळुरु-हुबळी-धारवाड, मुंबई-गोवा, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर अशा मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. या रेल्वेच्या लोकार्पणांचा कार्यक्रम यापूर्वीच पार पडणार होता. वंदे भारत एक्स्प्रेस ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईहून धावेल. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही ट्रेन गोव्यावरुन धावेल