आपल्याला सर्वांना माहित आहे सापाच्या अनेक प्रजाती आहेत व त्यात काही विषारी बिनविषारी आहेत तर असा एक साप कुणाला सापडला तर ती व्यक्ती होऊ शकते करोडपती. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाला खूप मोठी मागणी आहे ग्रीन ट्री पायथन असं या सापाचं नाव आहे. ग्रीन ट्री पायथन ही सापाची सर्वात महाग प्रजाती आहे. या सापाच्या अंगावर असणाऱ्या हिरव्या छटामुळे या सापाचे वेगळेपण दिसून येते. यामुळे तो खूप सुंदर दिसतो. या सापाची लांबी अंदाजे दोन मीटर पर्यंत असते व त्याचे वजन दीड ते दोन किलो असू शकते. ही एक सापाची खूप दुर्मिळ प्रजात असून देशात काही ठिकाणीच आढळते. साधारणपणे इंडोनेशिया,न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्येच ग्रीन ट्री पायथन ही सापाची प्रजाती आढळते. तसेच या प्रजातीचा साप झाडांवर राहतो आणि कीटक व लहान प्राण्यांचे शिकार करून स्वतःचा उदरनिर्वाह करतो. टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.