भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाची अंतिम लढाई असेल. भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. विश्वचषकासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये दाखल होत आहेत. पंतप्रधान मोदी 19 नोव्हेंबरला दुपारनंतर अहमदाबादला पोहोचतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम हे 1.32 लाख प्रेक्षकांच्या क्षमतेचं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया 20 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमने सामने आले आहेत. यापूर्वी 2003 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. क्रिकेटच्या महाकुंभाचा अंतिम सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.