शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतीदिन आहे.



या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.



शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे.



राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत.



बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत.



शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं.



ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली..



तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..



पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली..



शिवतीर्थावरुन बाहेर येताच दोन्ही गटात पुन्हा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं.



Thanks for Reading. UP NEXT

माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

View next story