अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या चर्चेत आहेत.



माधुरी दीक्षित-नेने आता लवकरच भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.



मात्र सध्या अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरु नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली आहे.



याआधीदेखील अशीच चर्चा रंगली होती.



पण सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही, असं म्हणत माधुरी दीक्षित यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.



लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.



तसेच लोकसभेचं तिकीट कोणाला द्यायचं हा सर्वस्वी निर्णय केंद्रातून होणार नाही.



त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.



काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते.



त्यावेळी उप. देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.