पुण्यातलं सध्याचं वातावरण एखाद्या हिल स्टेशनप्रमाणं झालं आहे.



पावसानंतर दाट धुक्याची चादर पुण्यावर पसरली आहे.



यामुळं आज हवेत गारवा तर आहेच, त्याच बरोबर धुक्याची चादर ही पसरली आहे.



गेले तीन दिवस अवकाळी पावसानंतर पुण्याचा पारा बऱ्यापैकी खाली आला आहे.



यामुळं पुण्यात वातावरण आल्हाददायक वाटत आहे. मात्र याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.



रस्त्यांवर व्हिजन कमी झाल्याने गाड्यांचा वेग मंदावतो आहे.



या वातावरणात पुणेकर मात्र पहाटे या धुक्याचा आणि थंडीचा आस्वाद घेण्यास बाहेर पडला आहे.



नागरिक व्यायाम आणि फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत.