अभिनेत्री सारा अली खान नं कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटामुळे चर्चेत असून प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. सारा अभिनेता अक्षय कुमार , रणवीर सिंह , सुशांत सिंह राजपूत , कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत चित्रपटात झळकली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अशातच आता अभिनेत्री सारा अली खाननं लग्नाबाबत मोठं गुपित उघड केलं आहे. सारानं सांगितलं आहे की, ती कुणाबरोबर लग्न करणार आहे सारानं एका मुलाखतीत सांगितलं आहे की, तिला असा नवरा हवा आहे जो तिच्यासोबत आईच्या घरी येऊन राहू शकतो.