भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये खेळला जातो.


पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने दुसऱ्या कसोटी सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे.


दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या संपूर्ण भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलनं माघारी धाडून मोठा विक्रम रचलाय.


एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. एजाजने एक-एक भारताचे दहा गडीना तंबूत पाठवलं.


या कामगिरीसह एजाज पटेलनं अनिल कुंबलेचा विक्रमाशी बरोबरी केलीय.


भारत- न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाज पटेलनं मोठा विक्रम रचलाय.


एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडींना बाद केलंय.


यात त्यानं 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्या आहेत. अनिल कुंबळेनं पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये 10 गडी बाद केले होते.