बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांच्या आनंद घेत आहे. इलियानानं तिच्या बीच हॉलिडेमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामधील तिचा स्टनिंग बिकनी लूक चांगलाच व्हायरल होतं आहे. इलियानानं मालदीवमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यामध्ये ती बिकनीमध्ये पोज देताना दिसत आहे. इलियानाच्या पांढऱ्या आणि लाल रंगाच्या बिकनी लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर पारा वाढवला आहे. बिकनी लूकमध्ये इलियाना सन बाथ घेताना पाहायला मिळतेय. इलियानाचा हा हॉट लूक चाहत्यांच्या चांगलास पसंतीस उतरलाय. नेहमीप्रमाणे चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.