पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न, केतकी दिसते प्रचंड सुंदर! आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी महत्वाचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर. गायिका असण्यासोबतच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे. ‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या केतकीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं असून तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये केतकी प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. केतकीच्या फोटोंवर चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.