अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिऊन होते. सकाळच्या चहामुळे दिवसभराचा उत्साह मिळतो. पण काही लोकांना खूप प्रयत्नानंतरही चांगला चहा बनवता येत नाही. चांगला चहा बनवण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. चहासाठी वापरण्यात येणारं दूध हे नेहमी कोमट असावं ते कोमट दूध चहामध्ये वापरावं. पाणी उकळत असताना त्यामध्ये वेलची आणि आलं घालावं. पाणी उकळ्यानंतर त्यामध्ये दूध घालावं. चहामध्ये साखर नेहमी शेवटी घालावी. त्यानंतर गाळणीने गाळून घेऊन त्या चहाचा तुम्ही आनंद घेऊ शकता.