राग येणे ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. अनेक लोक असे असतात की ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच राग येतो.
या रागाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. राग शांत करण्यासाठी तुम्ही काही योगासन करू शकता.
तुमच्या रूटीनमध्ये हे ३ योगासन करून तुम्ही राग शांत करू शकता.
सर्वांगासन: हे करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर सरळ झोपा. आता दीर्घ श्वास घ्या आकाशाकडे पाय उचला. कंबरेवर हात ठेवा आणि श्वास घेताना पाय डोक्याच्या दिशेने आणा.
हे करत असताना तुमचे खांदे, पाठीचा कणा आणि नितंब एका सरळ रेषेत आणा आणि काही वेळ या स्थितीत रहा.
अनुलोम-विलोम प्राणायाम : हे करण्यासाठी सर्वप्रथम पद्मासनात बसून, डावा हात गुडघ्यावर ठेवा. उजव्या हाताच्या बोटाने डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या.
यानंतर आपल्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. असे आवर्तन काही वेळ करा.
भ्रामरी आसन करण्यासाठी सुखासन किंवा पद्मासन आसनात बसून दीर्घश्वास घ्या आणि तीन बोटांनी डोळे बंद करा आणि कानावर अंगठा ठेवा. आता तोंड बंद ठेवा आणि मनात ‘ओम’ चा जप करा.