जर तुम्ही तुमच्या आहारात अक्रोडाचा समावेश केला तर ते तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकते.



अक्रोडमध्ये फायबर, ओमेगा-3 आणि फॅटी अॅसिड असतात. त्यांच्या मदतीने खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते. एकंदर आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.



हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही आहारात संत्र्याचाही समावेश करू शकता. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम आढळते.



संत्र्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे बीपी नियंत्रणात ठेवू शकता. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हाय बीपीची समस्या कमी होऊ शकते.



लो फॅट दही खाल्ल्यानेही फायदा होतो. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.



दह्याच्या नियमित सेवनाने हृदयाची गती बरोबर राहते. फॅटी फिशचाही आहारात समावेश करता येतो.



हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश नेहमी करावा. यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे असतात. लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी जे हृदयरोग कमी करण्यास मदत करतात.



हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने ऑक्सिजनयुक्त रक्त तुमच्या हृदयापर्यंत सहज पोहोचते. ते रक्तवाहिन्या उघडण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.