पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे केस गळू लागतात, त्यामुळे केस तुटण्याची समस्या खूप वाढते.



अशा परिस्थितीत, महिला अनेकदा घरगुती उपायांच्या मदतीने ही समस्या घरी सोडवण्याचा प्रयत्न करतात.



अशा वेळी मध (Honey) आणि केळीचा (Banana) केसांकरता मोठा फायदा होऊ शकतो ज्यामुळे पावसाळ्यात तुमच्या केसांना योग्य ते पोषण मिळण्यास मदत होते.



हेअर मास्क तयार करण्यासाठी, प्रथम एक पिकलेले केळे एका वाडग्यात पेस्ट होईपर्यंत स्मॅश करा.



. आता स्मॅश केलेल्या केळीमध्ये मध, दही आणि खोबरेल तेल घाला. हे सगळे एकत्र करा.



आता केस हलके ओले करा. त्यानंतर ओल्या केसांना हेअर मास्क लावा.



हेअर मास्क अर्धा तास ते एक तासापर्यंत राहू द्या, आता आपले केस कोमट पाण्याने चांगले धुवा, त्यानंतर तुमच्या आवडत्या शैम्पू आणि कंडिशनर वापरून केस स्वच्छ धुवून घ्या.



केळी केसांना मॉइश्चरायझिंग, मऊ आणि चमक आणण्यास मदत करते.



हे एक नैसर्गिक humectant आहे जे तुमच्या केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि कोरडेपणा कमी होतो. केसांना पोषण देणारे अँटिऑक्सिडंट (Anti-oxident) देखील त्यात असतात.