बृजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिन्यांपूर्वी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता कुस्तीपटूं सोबत आज विनेश फोगाट, संगीता फोगा सराव अभ्यास करताना पाहायला मिळालं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. देशातील नामांकित कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर 23 एप्रिल पासून पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु केलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी या आंदोलकांनी केली आहे. सात कुस्तीपटूंनी मुलींनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. परंतू, त्यांच्या तक्रारी देऊनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केली नसून याबाबत जाणून-बुजून विलंब केला जात असल्याचे मलिक म्हणाल्या