सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आयएनएस सुमेधा आणि IAF C-130J लढाऊ विमान सुखरूप परतलं आहे

सुदानमध्ये (Sudan) अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारताचे ऑपरेशन कावेरी सुरु झाले आहे.

या संबंधितची माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवारी ट्वीट करत दिली होती.

सुदानमधील भारतीय नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी या ट्वीटद्वारे सांगितलं.

गेल्या 11 दिवसांपासून सुदानची राजधानी खार्तूममध्ये देशाचे सैन्य

आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरु असल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विविध प्रकारचा हिंसाचार सध्या सुदानमध्ये होत आहे.

या परिस्थितीमधून भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत.

आतापर्यंत 534 भारतीय नागरिक सुखरुपपणे सुदान पोर्टवर पोहचले आहेत

त्यांना आयएनएस सुमेधामधून भारतात आणण्यात येत आहे.