महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनमध्ये क्रिकेट चाहत्यांच्या नजरा एका महिला खेळाडूवर खिळल्यात. ती म्हणजे, अमेलिया केर. WPL मध्ये मुंबई इंडियन्स सध्या फॉर्मात आहेत. जेवढी चर्चा MI च्या वुमन्स टीमची आहे, त्याहून अधिक चर्चा एका महिला क्रिकेटरची आहे. भारतीय चाहत्यांची नवीन इंटरनॅशनल क्रश मिळाली आहे. सध्या WPL मधील न्यूझीलंडची खेळाडू अमेलिया केरची जोरदार चर्चा रंगलीये. अमेलियाच्या निखळ सौंदर्यानं अनेकांना भुरळ घातली आहे. अमेलिया केर न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे. अमेलिया 22 वर्षांची असून तिने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. यावेळी अमेलिया फक्त 16 वर्षांची होती. अमेलिया केर महिलांच्या क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक. महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम अमेलिया केरच्या नावे आहे.