भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच 1 मार्चपासून होणार सुरु इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. म इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकू शकतो. या मालिकेत सलग तिसरा विजय नोंदवण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. इंदूर कसोटीपूर्वी टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू मैदानात कसून सराव करत आहे. मैदानात घाम गाळताना दिसत आहे. दरम्यान इंदूर कसोटीपूर्वी टीम इंडियाने चांगलाच सराव केला आहे. या सरावाचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संघाचा प्रत्येक खेळाडू तिसऱ्या कसोटीसाठी जीव तोडून सराव करत आहे. यामध्ये विराट कोहली, केएल राहुल, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा असे सारे खेळाडू आहेत. काही खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसले, काहींनी नेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजीचा सराव केला.