स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा आज वाढदिवस नताशा स्टॅनकोविकला वाढदिवसानिमित्त हार्दिककडून खास शुभेच्छा शुभेच्छांचा खास व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर हार्दिकनं केले पोस्ट 4 मार्च 1992 रोजी सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशानं नुकतंच ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा हार्दिकशी केलं लग्न पांड्याने पत्नी नताशाला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना इन्स्टावर पोस्ट केला VIDEO व्हिडिओमध्ये त्याचे आणि नताशाचे अनेक अप्रतिम फोटो पोस्ट आहेत. दुसरीकडे, हार्दिकने या व्हिडिओच्या कॅप्शनही खास दिलं आहे. तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेबी.... तुझ्यावरील माझं प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. असं आहे कॅप्शन कोरोना काळात हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक लग्नबंधनात अडकले होते. नताशा स्टॅनकोविक बॉलिवूड अभिनेत्री आहे.