भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना सुरु अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज ही उपस्थित होते पहिल्या दिवशीच्या खेळाडसाठी मैदानात उपस्थित राहिले. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकल्यामुळे आता ही मालिका भारत सामना जिंकून जिंकणार की ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बरोबरीत सुटणार हे पाहावं लागेल. पीएम मोदी आणि अँथनी अल्बानीज हे दोघेही नाणेफेकीदरम्यान म्हणजेच खेळ सुरु होण्यापूर्वी मैदानात पोहोचले दोन्ही पंतप्रधानांनी आपआपल्या देशाच्या कर्णधारांचा खास कसोटी कॅप देऊन सन्मान केला. दोन पंतप्रधानांनी गोल्फ कारने मैदानाची फेरी मारली. उपस्थित हजारो प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या सर्व कार्यक्रमाबद्दल दाद दिली.